🕒 1 min read
अहमदनगर:- यंदा कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन नगर जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने यासंबंधी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. ह्या निवडणुकीसाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, शुक्रवारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार निलेश लंके, आ.मोनिकाताई राजळे, माजी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी, जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, शिवाजी कर्डिले, पांडुरंग अभंग, अरुण तनपुरे, अण्णासाहेब म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बँकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. पारनेरमधून माजी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनी अर्ज दाखल केला आहे. याच तालुक्यातून आमदार नीलेश लंके आणि उदय शेळके यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. श्रीगोंद्याबरोबरच पारनेरमध्येही चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी केलेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतर देखील अण्णांचा बाणा कायम !
- शेतकरी नेत्यांना चर्चेत रस नाही; कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
- ‘ग्रामपंचायत निवडणूक निकालांनी राज्य सरकारवरचा जनतेचा रोष दाखवून दिला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
