Share

‘मी तुला मारहाण करु शकत नाही, मी तसं केल्यास लोकं मला नावं ठेवतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत  सोनू सूदने अनेक गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. कधीकाळी चित्रपटातून व्हिलनचं काम करणाऱ्या सोनूची ही हिरोपंती त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही भावली आहे. त्यातूनच साऊथचा मेगास्टार अभिनेता चिरंजीवीने चक्क सोनू सूदला ऑनस्क्रीनही मारणं शक्य नसल्याचं म्हटलंय.

सोनूची लोकप्रियता वाढली असून रियल लाईफमधील व्हिलन रियल लाईफमध्ये हिरो बनला आहे. त्यामुळेच, दाक्षिणात्य चित्रपटांचा मेगा स्टार अभिनेता चिरंजीवीने सोनू सूदला चित्रपटातही मारहाण करणार नसल्याचं म्हटलंय. सोनूच्या सामाजिक कामामुळं चित्रपटासाठी त्याला अनेक दिग्दर्शकांकडून लीड रोल देण्यात येत आहेत. आचार्य सिनेमाच्या शुटींगवेळचा एक किस्साने सोनूने नुकताच सांगितला. चित्रपटातील एका दृश्यामध्ये सोनूला चिरंजीवकडून मारहाण करण्यात येणार होती.

मात्र, चित्रपटातही मी तुला मारहाण करु शकत नाही. कारण, मी तसं केल्यास लोकं मला नावं ठेवतील, माझ्या इमेजला त्यामुळे धक्का बसेल, असे चिरंजीवीने म्हटल्याचे सोनूने सांगितलं. तसेच, एका दृश्यामध्ये सोनूच्या डोक्यावर चिरंजीव पाय ठेवतात, पण तोही सीन पुन्हा नव्याने बनविण्यात आला आहे. कोरोनाकाळातील सोनूची प्रतिमा पूर्णत: बदलून गेली असून आता सोनूला चाहते व्हिलनची रूपात बघू शकत नाहीत. त्यामुळे सोनू आता सकारात्मक भूमिका साकारणार असल्याचं समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!