Share

‘विराटनंतर ‘हा’ तरुण खेळाडू होणार RCB चा कर्णधार’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयपीएल आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. काही दिवसातच आयपीएल २०२१ चा विजेता कोण हे समजणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आयपीएल 2021 नंतर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. यावर्षी आरसीबीने आयपीएलमध्ये चमकदार प्रदर्शन दाखवून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. विराटचा आरसीबाचा कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम असणार आहे. म्हणून आरसीबी आता विराटच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकण्यास इच्छुक आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्पा सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने एक व्हिडिओ जरी करत, ‘कर्णधार म्हणून या संघासोबत हा माझा शेवटचा हंगाम असेल. पण आरसीबीचा खेळाडू राहीन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व RCB चाहत्यांचे आभार मानतो.’ असे या व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला होता.

तर आता विराटनंतर आरसीबीचा कॅप्टन कोण होणार? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. या पदासाठी सर्वात प्रथम नाव समोर येतंय ते म्हणजे एबी डिविलियर्सचं. आयपीएल इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला डिविलियर्स गेल्या अनेक वर्षांपासून आरसीबीचा आधारस्तंभ आहे. पण, तो आता त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

त्यामुळे तो आरसीबीचा कर्णधार होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आरसीबीचा माजी बॉलिंग कोच आशिष नेहरा यानं टीमच्या कॅप्टनपदासाठी नाव सुचवलं आहे. नेहरानं ‘क्रिकबझ’ शी बोलताना सांगितले की, ‘आरसीबीला दीर्घकाळासाठी कॅप्टन हवा असेल तर देवदत्त पडिक्कल हा चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. फ्रँचायझीला दीर्घकाळासाठी कॅप्टन हवा असेल तर त्यांनी पडिक्कलच्या हातामध्ये टीम सोपवली पाहिजे.’

विराट कोहली पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून RCB शी संबंधित आहे, परंतु 2011 मध्ये त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. डॅडेनियल विटोरीच्या जागी त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. कर्णधार म्हणून विराट कोहलीने 131 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये त्याने संघाचे नेतृत्व 60 सामन्यांमध्ये केले आहे, तर संघाने 64 सामने गमावले आहेत. तीन सामने बरोबरीत होते तर चार सामन्यांचा निकाल कळू शकला नाही. विराटच्या नेतृत्वाखाली या संघाने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा देखील निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!