Share

जावाई हरल्याच दुखः नाही , चंद्रकांत खैरे पडल्याचे दुखः – रावसाहेब दानवे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ४ टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी धक्कादायकरित्या पराभव केला आहे. याठिकाणी अपक्ष असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांनी मतविभाजनी केल्याने खैरेंचा पराभव झाला आहे. त्यामुळे खैरेंनी आपल्या पराभवाला खुद्द रावसाहेब दानवेंना जबाबदार धरत दानवे यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे. यावर रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे,.

मला जावाई हरल्याच अजिबात दुखः नाही तर चंद्रकांत खैरे पडल्याचे दुखः झाले आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. तर पराभवच खापर कोणावर फोडायचं म्हणून माझ्यावर फोडलं जात असून दानवे आपला मित्र आहे म्हणून सहज समजून घेईल म्हणून माझ्यावर आरोप केले जात असल्याचे दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही आजपासूनच विधानसभेच्या तयारीला लागलो असून येत्या विधानसभेत कॉंग्रेसला उमेदवार देखील मिळणार नाही , त्यांना त्यासाठी जाहिरात द्यावी लागेल अशी खिल्ली देखील रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसची उडवली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!