टीम महाराष्ट्र देशा : भाजप विरोधी बंड थंड झाल्यानंतर मावळचे भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी भाजप युतीचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांना स्पष्ट पाठींबा दिला आहे. रवींद्र भेगडे यांना युतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रवींद्र भेगडे यांचे बंड शमले. मात्र आता रवींद्र भेगडे यांनी बाळा भेगडेचं मावळचे आमदार, असा नारा देत स्पष्ट पाठींबा दिला आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. यावेळी मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भेगडे यांचेचं सहकारी सुनील शेळके यांना कॉंग्रेस आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार तोडीसतोड असल्याने मावळात हायव्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे हे दोनदा निवडणूकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिंकली तर त्यांच्यासाठी ही हॅट्रिक असणार आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निष्ठावान बाळासाहेब नेवाळे यांना डावलत सुनील शेळके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. नेवाळे यांना उमेदवारी डावल्याने नेवाळे समर्थक चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे याचा फटका शेळके यांना बसणार असल्याचं दिसत आहे. तर रवींद्र भेगडे यांचेही बंड शमले असल्याने शेळके यांच्या अडचणीत अजूनचं वाढ झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

