Share

ऑरेंज झोनमध्ये राहणाऱ्या रवी शास्त्रींना ‘या’ दोन मित्रांसोबत प्यावीशी वाटते बियर

Published On: 

मुंबई : टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या आपल्या अलिबागच्या बंगल्यात लॉकडाऊन आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या 2 मित्रांच्या सोबत बियर पिण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. एका स्पोर्ट टीव्हीच्या इंटरव्हीयू मध्ये रवी शास्त्री यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे.

ते म्हणाले की, मी सध्या जिथे राहतो तो भाग हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, वाइनचे दुकान कुठेतरी उघडलेले असेल, मी तेथून बिअर घेईन आणि माझा साथीदार लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि रॉजर बिन्नी यांच्याबरोबर बीयर शेअर करेल.

यावेळी रवी शास्त्री यांनी क्रिकेटमधील अनेक गंमतीजमती संगीतल्या. तर 1985च्या बेन्सन अँड हेजेस विश्वचषकातील काही किस्से सांगितले. शास्त्री म्हणाले की, त्यावेळी भारतीय संघ बऱ्यापैकी चंगला होता. जर जुना भारतीय संघ आणि सध्याचा भारतीय संघ यांच्यात स्पर्धा असती तर 1985 च्या भारतीय संघाने निश्चितच टक्कर दिली असती.

भारतीय संघाने 1983 मध्ये विश्वचषक जिंकला होता पण 1985 मधील भारतीय संघ त्यापेक्षा चांगला संघ होता. शास्त्री म्हणाले की, मी दोन्ही संघात सहभागी होतो, त्यामुळे मला हा फरक स्पष्टपणे कळला, असे शास्त्री म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!