मुंबई : अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रश्मिका मंदानासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन दिलं आहे की,”पुष्पा!” तर रश्मिकानं यावर प्रतिक्रिया देताना लिहिलंय,”सर, हम झुकेगा नही”. ऱश्मिकाच्या या उत्तराने चाहत्यांनी अमिताभ यांची मस्करी केली आहे. रश्मिकानं उलट उत्तर दिलं म्हणून अमिताभ यांना आता वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे. पुष्पा सिनेमातला हा पंच डायलॉग खूपच व्हायरल झाला होता.
रश्मिका आता अमिताभ बच्चनसोबत ‘गूडबाय’ सिनेमात आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. हा सिनेमा रश्मिकाचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. ‘गूडबाय’ सिनेमाचं शूटिंग उत्तराखंड मध्ये ऋषिकेश और देहरादून मध्ये देखील पार पडलं आहे.
रश्मिका लवकरच आपल्याला सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा या वर्षीच १० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रश्मिकाचे चाहते आता बॉलीवूडमध्येही मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे याचा फायदा तिच्या ‘मिशन मजनू’ आणि ‘गुडबाय’ सिनेमांना होणार यात शंकाच नाही.
महत्वाच्या बातम्या :
“उत्तरप्रदेशात मशिदींवर भोंगे नाहीत का?”- मनिषा कायंदे
RRR मधून आलिया भट्टचेच नव्हे तर मकरंद देशपांडेंचेही सीन्स केले कट
“महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी…”- नितेश राणे
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून हृतिकची एक्स मेहुणी फराह खान अली म्हणाली..
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”; भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

