मुंबई- गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपमधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
खडसेंपाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील घड्याळच हाती बांधणार आहेत. भाजपमधील जवळपास १५ आमदार आपल्या संपर्कात असून ते देखील भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला होता. यासर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली.
याबाबत केंद्रीयमंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी घेतलेला निर्णय यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला दिला आहे.वृत्त माध्यमांशी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले,’नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा,’ असे रावसाहेब दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- ‘कधी भाजपाच्या मुख्यालयावर धाड घातली अशीही बातमी येऊ दे’
- ‘खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल’
- दमानिया यांच्या गंभीर आरोपांवर खडसे सोडणार आज मौन?
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

