Share

रणजितसिंह मोहिते – पाटील यांची मंत्रीमंडळात १०० टक्के वर्णी लागण्याची चर्चा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते – पाटील आणि कालिदास कोळंबकर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मंत्रीमंडळातील प्रवेश नक्की मानला जात आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्या प्रचारार्र्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूज शहरात पार पडली़ या सभेला विराट जनसमुदाय गोळा करून मोहिते-पाटील परिवाराने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर लोकसभा प्रचारात अकलूजमधून १ लाख मताचा लीड रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मिळवून देऊ असेही मोहिते-पाटील परिवाराने सांगितले होते त्यानुसार एक लाखांच्या वर लीड मोहिते-पाटील यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यातही मोहिते-पाटील परिवाराने कुठेही कसर ठेवली नाही. या एकूणच कामगिरीवरून रणजितसिंह मोहिते-पाटीलांची मंत्रीमंडळातील वर्णी १०० टक्के खरी मानली जात आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!