टीम महाराष्ट्र देशा- सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. नागपूर, अमरावती, बारामती, मावळ, औरंगाबाद, नांदेड, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि रायगड या जागांचे कल हाती येऊ लागले आहेत.
या मतादारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे तर त्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आता येथून कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येथे मतमोजणीली सुरुवात झाली असून, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर असून, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आघाडीवर आहेत.महास्वामी ५५ हजारांच्या मतांनी आघाडीवर आहेत.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हे तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या मतदारसंघासाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.नवव्या फेरीअखेर निंबाळकर 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

