टीम महाराष्ट्र देशा – देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. माजी न्या. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर १३ महिने त्यांनी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले.
मात्र माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी टिकास्त्र सोडले आहे. ‘राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना! आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या. बाबासाहेब बघता आहात ना. असा टोमणा आव्हाड यांनी ट्वीटरवरुन मारला आहे. तसेच, वरिष्ठ सरकारी अधीकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर वर्ष राजकारण प्रवेश बंदी हि काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल, असेही त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.
आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ‘राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना!…आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या…बाबासाहेब बघता आहात ना…वरिष्ठ सरकारी अधीकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर 10 वर्ष राजकारण प्रवेश बंदी हि काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल.
राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना!
…
आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या
…
बाबासाहेब बघता आहात ना
…
वरिष्ठ सरकारी अधीकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर 10 वर्ष राजकारण प्रवेश बंदी हि काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 17, 2020
तसेच पुढच्या ट्वीटमध्ये न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.ते म्हणतात ‘दिल्ली हायकोर्टाचे जस्टीज् मुरलीधर यांनी, ज्यांनी दंगा भडकवला; त्यांना अद्याप का अटक केली नाही, असा प्रश्न विचारला. एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. बक्षिस म्हणून त्यांची बदली करण्यात आली.’
दिल्ली हायकोर्टाचे जस्टीज् मुरलीधर यांनी, ज्यांनी दंगा भडकवला; त्यांना अद्याप का अटक केली नाही, असा प्रश्न विचारला. एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. बक्षिस म्हणून त्यांची बदली करण्यात आली.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 17, 2020
तसेच आपल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी माजी सर न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर थेट निशाणा साधला.ते म्हणाले,’ मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई साहेब यांनी सरकारच्या बाजूने अनेक निर्णय दिले. बक्षिस काय मिळाले तर राज्यसभेवर निवडून दिले. आता समाजाने ठरवायचेय, गोगोई साहेब की मुरलधीर !’
मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई साहेब यांनी सरकारच्या बाजूने अनेक निर्णय दिले. बक्षिस काय मिळाले तर राज्यसभेवर निवडून दिले. आता समाजाने ठरवायचेय, गोगोई साहेब की मुरलधीर !
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 17, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

