Share

‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने केला रिक्षातून प्रचार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध सिने कलाकारांच्या प्रसिद्धीचा वापर मतधिक्यात करून घेण्यासाठी कॉंग्रेसने उत्तर मुंबई मधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकरने आपल्या मतदार संघात प्रचाराला एका अनोख्या पद्धतीने सुरवात केली आहे. यावेळी उर्मिलाने रिक्षा चालवत लोकांना मतदान करण्याची विनंती केली आहे. आता या अनोख्या प्रचाराचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

उर्मिला मातोंडकर आज प्रचारासाठी गोरई परिसरात फिरत होती. त्यावेळी तिनं रिक्षा चालकांची भेट घेवून मतदान करण्याचं आवाहन केलं. इतकंच नव्हे तर तिनं चक्क रिक्षा चालवत आसपासच्या लोकांनाही मतदान करा असे आवाहन केले. या संदर्भातील फोटो उर्मिलानं स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटो सोबत तिने काही मजकूर लिहिला आहे त्यामध्ये तिने ‘तुम्हाला रिक्षातून कुठं सोडायचंय का? रिक्षा चालक आपल्या मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यांना भेटून आनंद झाला’ अस म्हंटल आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात तिची लढत असणार आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. आता काँग्रेसनं उर्मिलाला रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!