Share

उर्मिला मातोंडकरांना रामगोपाल वर्मांचा पाठिंबा

Published On: 

मुंबई : जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी कंगणा रनौतला खडसावल्यानंतर कंगणाने उर्मिला मातोंडकरांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. आता महाराष्ट्रातून आणि देशातून उर्मिला मातोंडकरांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून पाठिंबा मिळत असून आता यावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने संपूर्ण बॉलिवूडला ड्रग अडिक्ट म्हटल्यानंतर उर्मिला मातोंडकरने तिला चांगलंच फटकारलं होतं. यानंतर कंगनाने तिला एका वृत्त वाहिनीवर ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं. सिनेसृष्टीतील बर्याच लोकांनी कंगनाच्या या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली होती. आता सिनेनिर्माते राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाचं समर्थन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून उर्मिलाचं कौतुक केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करत म्हटलं की, मी कोणाबद्दलही चुकीचा शब्द वापरणार नाही. मला विश्वास आहे की उर्मिला मातोंडकर हिने रंगीला, सत्य, कौन, भूत, एक हसीना थी यांसारख्या सिनेमांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तसेच अनेक कठीण भूमिकांमधून तिने आपलं हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व सिद्ध केलं आहे.

उर्मिलाने मुलाखतीत काय म्हटलं

मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाली की, जिथे कंगना राहते तो हिमाचल प्रदेश हा तर अमली पदार्थांचा गड आहे. हे तिला माहीत नाही का? त्याचवेळी जया बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडची प्रतिमा डागळ्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं.

सुशांत प्रकरणानंतर ड्रग्जची लिंक उघडकीस आली

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात, रिया चक्रवर्तीच्या कबुली जबाबानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आले. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा सर्रास वापर केला जात असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. नारकोटिक्सची टीम अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेऊ शकते असंही म्हटलं गेलं होतं.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!