Share

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडिवर बसून पक्ष चालवत आहेत – रामदास कदम

Published On: 

Ramdas Kadam। मुंबई : शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग काल प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. तर यानंतर आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी टीका केली आहे.

रामदास कदम म्हणाले कि, तुमच्या आदित्य ठाकरेंचं शिवसेनेत योगदान काय? आदित्य ठाकरे हे तर आमदार आणि खासदारांनाही पाहत नाही. माझं खातं त्यांनी चालवलं. प्लास्टिक बंदी मी केली आणि हा माणूस म्हणतो प्लास्टिक बंदी मी केली. तेही सभागृहात सांगतो. किती खोटं बोलाल? दुसऱ्यांच्या कामाचं किती क्रेडिट घ्याल. हे हस्यास्पद आहे. असं चालत नाही, असं रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिले नाहीत. ते शरद पवार यांच्या विचारांचे झाले आहेत. पवारांच्या मांडिवर बसून ते पक्ष चालवत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संदीपान भूमरे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली असे भूमरे यांनी म्हटले आहे. आम्ही अनेकदा उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडले पाहिजे, मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्हाला बाहेर पडावे लागले. म्हणून आम्ही बंड केले, नाहीतर शिवसेना संपली असती असे संदीपान भूमरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!