Share

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रामदास कदम राहणार अनुपस्थित

Published On: 

मुंबई : शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा खूप महत्वाचा मानला जातो. परंतु या वर्षीच्या दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेना नेते तसेच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे अनुपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना रामदास कदम यांनी पत्र पाठवलं आहे.

अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे. त्यानंतर रामदास कदम यांना दसरा मेळाव्याल एन्ट्री नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडत आहे. रामदास कदम या मेळाव्याला हजर राहणार का याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं आहे.

इन्फेक्शन टाळण्यासाठी उपस्थितीविषयी निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्या वेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवल्या आहेत.गेले तीन महिने रामदास कदम हे आजारी आहेत. रामदास कदम यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात आणि घरी गेलेदोन महिने उपचार सुरु होते. इन्फेक्शन होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!