Share

‘मी पुन्हा येईल’ असं म्हणाले आणि न आल्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेत – रामदास कदम

Published On: 

रत्नागरी : पहिल्या दिवशी आज कोकणातील जनतेशी संवाद साधल्यानंतर एक बाब स्पष्ट झाली की, वादळ येऊन 9 दिवस झाले. पण, कोकणात राज्य सरकारची कोणतीही मदत अद्याप पोहोचलेली नाही. राज्य सरकारने कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. “महाविकास आघाडी सरकारला बदनाम कसं करता येईल, एव्हढंच देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईल’ असं म्हणाले आणि न आल्यामुळे फ्रस्ट्रेट झाले आहेत”, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.

‘दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक’

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात जावून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन रायगडला 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटींची मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

दरम्यान, “चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना लोकांना जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे”, अस दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे यावे – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!