Share

आमची उघड तर प्रकाश आंबेडकरांची युतीला छुपी मदत, रामदास आठवलेंचा दावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: वंचित बहुजन आघाडीचे आणि प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत करत असल्याची टीका कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून केली जात आहे. यामध्ये आता भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांची देखील भर पडली आहे.

आपण युतीचा घटक असून भाजप – शिवसेनेला उघडपणे पाठींबा दिला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे छुप्या पद्धतीने युतीलाच मदत करणारी भूमिका घेत आहेत, असा दावा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना आठवले यांनी हा दावा केला आहे.

भाजपची साथ सोडणार नाही
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या मित्रपक्षांना जागा सोडलेली नसल्याने ते नाराज आहेत. शनिवारी युतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा सोडण्याचे आश्वासन दिल्याने आरपीआय ( आ ) , रासप, शिवसंग्रामने शांत राहण्याची भूमिका घेतली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!