Share

दुसरी लाट आली तर यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो तुम्ही काळजी घ्या – महापौर

Published On: 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येतेय. दरम्यान येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये. याचसंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय.

आगामी काळात कोरोना संसर्ग वाढू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन आपण नजीकच्या भविष्यकाळातील नियोजन केलंय, यंत्रणाही सज्ज आहेत. पण आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे ! सामूहिकपणे लढून हे दुसरं संकट नक्की टाळता येवू शकेल ! अस आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून केलं आहे.

तर, जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली होती. ती येईलच असे नाही. पण दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!