🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सर्व कल हाती आले असून भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीला मोठे यश मिळताना दिसत आहे. त्यातही भाजपने जोरदार मुसंडी मारली असून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हे स्थान पटकावले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे नेते व राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी भाजपच्या यशाचे विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळेच बिहारमध्ये भाजपला यश मिळाले असल्याचे म्हटले आहे.
प्रा.शिंदे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेतृत्व, प्लॅनर आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा ते बिहारमध्ये गेले तेव्हा त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन योजनाबद्ध नियोजन केले. दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे अंतिम टप्प्यात ते बिहारमध्ये जाऊ शकले नाहीत. ते दूरदृष्टीचे नेते असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी.नड्डा यांनी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे बिहार निवडणुक विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे देखील योगदान महत्त्वाचे आहे. बिहार निवडणुकीच्या निकालादरम्यान सध्या एनडीए आघाडीवर आहे. याचा अर्थ एक्झिट पोल आणि सी व्होटर यांची मते सरळ अपयशी होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि नितीशकुमार यांच्या विरोधात जनमत जाणार, असा समज पसरवला जात होता तो आता निकालाच्या पार्श्वभूमीवर खोटा ठरताना दिसत आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीए जिंकेल. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे योगदान देखील बिहार निवडणुकीत महत्त्वाचे आहे. बिहार राज्याला पुढे घेऊन जात असताना नितीश सरकारने दळणवळणाची साधने निर्माण केली, शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविले याला बिहारच्या जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळताना दिसत आहे, असे प्रा. शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- ‘मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या’
- देवेंद्र फडणवीसांकडून ‘मुंबई इंडियन्स’चं अभिनंदन !
- नोटबंदीपेक्षा कोरोनामुळे कॅशलेस झाली अर्थव्यवस्था; ऑनलाइन खरेदीत वाढ
- सोशल मिडियाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे -प्रविण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
