Share

#भंडारा : मृत तान्ह्या बाळाच्या पालकांना मीडियाशी बोलू नका म्हणून धमकावले जात आहे?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील आजची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने यांची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकारणी हलगर्जीपणा दाखविलेल्या व्यवस्थापनाची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदार राम कदम यांनी देखील सरकारवर तोफ डागली आहे. भंडारा येथील 10 चिमुकल्या बाळाच्या हत्ये नंतर काही संतापजनक माहिती समोर येते आहे. हे प्रकरण लवकर थंड गुलदस्त्यात जावे म्हणून निष्पाप मृत तान्ह्या बाळाच्या आई वडिलांना आज मीडियाशी बोलू नका म्हणून धमकावले जात आहे? कोणा कोणाचा आवाज दाबणार आहात ? असा थेट सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!