Share

राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, शेट्टींचा निर्वाणीचा इशारा

Published On: 

मुंबई : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला कधीच धक्का बसणार नाही, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सदृढ ठेवण्याचं काम राज्य शासन करत आहे. यामागे राज्य सरकार दुधाची भुकटी बाहेरून आणताना कोणी आंदोलन केलं नाही, मात्र आता विरोधी पक्षांनी हा कट रचला आहे, असं मत दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी मांडलं आहे. हे दुध आंदोलनासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर बोलत होते.

जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे

राज्याभरात दुध दराला घेऊन चिघळलेल्या दुध आंदोलनासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानंदाचे अध्यक्ष, दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, राज्यभरातील विविध दूध संघाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी आक्रमक होत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणाने पुढे आल्याशिवाय तोडगा निघणार नाही. पण राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही. असा सरळ इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दुध भुकटी आणि बटरचा प्रश्न आहे ज्यामुळे भाव पडले आहेत. त्याबाबत केंद्र सरकारशी बोलून निर्याती संदर्भात पाठपुरावा करावा, अशी चर्चा बैठकीत झाली. WTO चा एकही सदस्य नियम पाळत नाही. सबसिडी देऊन देशातील शिल्लक दुध भुकटी निर्यात करण्यात यावी, मंत्री सुनील केदार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही आणि दूध उत्पादकांना दिलासा मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील. अस राजू शेट्टी म्हणाले आहेत.

मी अथवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कुठेही बाहेर निघालो नाही, तरीही हा संसर्ग झाला’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!