परभणी – राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत. मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणं दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरासह स्थानिक परिसर प्रशासनाने सॅनिटाईज करून सील केला आहे.
दरम्यान, मी अथवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कुठेही बाहेर निघालो नाही, तरीही हा संसर्ग झाला. बहुतेक बाहेरून घरी येणारा भाजीपाला अथवा इतर वस्तुंच्या माध्यमातून हा संसर्ग झाला असावा असा माझा अंदाज आहे. शिवाय माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी फोनवरून एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधीमध्ये करोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड , अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे करोनावर यशस्वी मात करुन परतल्यानंतर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख व शिवसेनेचे आमदार वैभव नाईक,नरेंद्र दराडे,यांनाही करोनानं गाठलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
छातीवर दगड ठेवून शासनाला हा निर्णय करावा लागला, मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर
‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका
उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय, ठाकरेंच्या समर्थनार्थ कॉंग्रेस मैदानात
दुध दरवाढीसाठी स्वभिमानीचे आक्रमक आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

