टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. भाजप युतीला शह देयचा असेल तर वंचितला एकट्याने लढून चालणार नाही. त्या पार्श्वभूमीवर वंचितचे काही नेते चर्चेसाठी तयार आहेत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. दै. सकाळ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. त्यामुळे याचा फायदा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. मात्र भाजप युतीला शह देयचा असेल तर वंचितला एकट्याने लढून चालणार नाही. त्यांना मदत घ्यावी लागेल, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचितचे काही नेते चर्चेसाठी तयार आहेत. भविष्यात एखादे नवीन राजकीय समीकरण होण्याची शक्यता आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
तसेच राजू शेट्टी पुढे म्हणाले की, भाजप-शिवसेनेला पराभूत करणे, हा सर्व विरोधी पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. यासाठी महाआघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या आघाडीत मनसे व वंचित बहुजन आघाडी यांना घेण्यासाठी आपण आग्रह धरला आहे. हे दोन्ही पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर स्वाभिमानीही स्वतंत्रणपणे या दोन्ही घटकांना एकत्र करून लढण्याची तयारी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

