Share

‘उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही’

Published On: 

बुलढाणा : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे.

राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल बुलडाण्याच्या जळगाव जामोद याठिकाणी ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणाऱ्या सरकारच्या विरोधात उपविभागीय कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला.यावेळी बोलताना शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही. द्यायचे नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का? असे म्हटले आहे. रोज १० शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर प्रहार केला.

मुख्यमंत्री व्हायच्या आधी मी शेतकऱ्यांना तुम्हाला चिंतामुक्त करतो, कर्जमुक्त करतो, सातबारा कोरा करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता गावातील ५ लोकांनाही जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळत नसल्याचे शेट्टी म्हणाले. हे सरकार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचेही शेट्टी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!