पुणे : संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला.
विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.
आता या कृषि विधेयकांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक होत सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल.पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत’. अस म्हणत राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
https://twitter.com/rajushetti/status/1307937885111439360?s=20
दरम्यान, केंद्र शासनाचे कृषी विधेयक राज्यसभेत प्रचंड गदारोळात बहुमताने मंजूर करण्यात आले आहे; पण हे विधेयक शेती, माती व शेतकरीद्रोही आहे. संसदेत भाजपचे बहुमत असले तरी, देशभरात रस्त्यावर शेतकऱ्यांचेच बहुमत आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा देशभरातील शेतकरी धिक्कार करीत आहेत. किसान सभा व 208 शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या कायद्याच्या विरोधात शुक्रवारी (दि. 25) देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशनानंतर के.के.रेंज बाबतची वस्तूस्थिती जनतेसमोर मांडणार- सुजय विखे
- ‘शरद पवारांचा गेम अजित पवारांनीच केला!’
- लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये ठिकठिकाणी मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन
- ‘या’ जबरदस्त चित्रपटाचा सीक्वलही लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला…
- ‘ते’ अधिकारी पहाटेच्या मुख्यमंत्र्यांना सामील! सामनातून फडणवीसांवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

