Share

‘राजसाहेबांचा आदेश…हिंदू सण साजरे होणारच, यंदाची दहीहंडी दणक्यात करा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. उद्याच दहीहंडी असून मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीहंडी होणारच असा निर्धार केला आहे.

दहीहंडीचे आयोजन करण्यावर मनसे ठाम असून ठाण्यात तशी तयारी देखील सुरु झाली आहे. दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे. मनसेच्या अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

‘आदेश राजसाहेबांचा…हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात! उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. चलो ठाणे’, असा नारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे उद्या दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम असून आता पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!