Share

राजीव सातव, तुम्ही मागील दारातून आत आला आहात! तुम्ही काय तत्वज्ञान सांगताय

Published On: 

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७४ व्या स्वातंत्र्य दिवसाचे ध्वजारोहण पार पडले. यानंतर, परंपरेनुसार पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. या प्रदीर्घ भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतानाच भारताच्या आत्मनिर्भरतेच्या अभियानाला आता मोठे स्वरूप देण्यासाठी आवाहन देखील केले. तर, आता काँग्रेसकडून मोदींच्या या भाषणावर टीका केली जात आहे.

पंतप्रधान मोदींनी आता ‘मेक इन इंडिया’ या अभियानाला विस्तृत करण्याची गरज असून आपण आपल्या देशाच्या गरजा भागवण्यासोबतच ‘वसुधैव कुटुंबकम’ या आपल्या संस्कृतीप्रमाणे भारतात नवनवीन उत्पादन बनवून जगातील असलेल्या गरजादेखील आपण पूर्ण करू शकतो शकतो यासाठीच आता ‘मेक फॉर वर्ल्ड’ ची देखील घोषणा केली.

आता ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नवीन जुमला: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचा मोदींच्या भाषणावर निशाणा

या मेक फॉर वर्ल्डची आता काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी खिल्ली उडवल्याचे दिसते. त्यांनी एक ट्विट केले आहे. ‘ मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टँड अपच्या एकूणच अपयशानंतर आता “मेक फॉर वर्ल्ड”च्या नव्या जुमल्याच्या सगळ्यांना शुभेच्छा’, अशा प्रकारे त्यांनी ट्विटमध्ये टीका केली आहे.

पवार कुटुंबीय आज एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच बारामतीतून आली ‘ही’ मोठी बातमी

आता राजीव सातव यांच्या या टीकेला भाजपा महाराष्ट्रचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी देखील ट्विट करत प्रत्युत्तर दिले असून काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. अवधूत वाघ यांनी,  “२०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवता पळुन गेलेले सिटिंग खासदार आपण, मागील दारातून आत आला आहात हे लक्षात ठेवा. गेली ५० वर्षं गरीबी हटाव चा जुमला देणारा तुमचा पक्ष.. तुम्ही काय तत्वज्ञान सांगताय? स्वातंत्र्यदिनाच्या तुमच्या ‘आलु से सोना’ फॅक्टरीला खुप खुप शुभेच्छा”, अशी जहरी टीका राजीव सातव व काँग्रेस पक्षावर केली आहे.

पानपट्टीचा व्यवसाय सुरु करा अन्यथा…व्यवसायीकांची उपविभागीय अधिका-यांकडे धक्कादायक मागणी

दरम्यान, मोदींनी २१ व्या शतकातल्या तिसऱ्या दशकात पदार्पण करताना भारत आता आत्मनिर्भरतेच्या उंबरठ्यावर असून आपल्या सर्व हुतात्म्यांनी, स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरित असा देश आपण आता घडवण्याच्या जवळ असून या कोरोना काळात आपल्याला आत्मनिर्भरतेचे महत्व पटवून दिले आहे त्यामुळे किती दिवस आपण बाहेर कच्चा माल देणार आणि पक्का माल जास्त किंमतीने आयात करणार असा सवाल केला. तसेच संरक्षण दलांनी घेतलेल्या १०१ वस्तूंच्या आयातीवरील बंदीचा उल्लेख देखील त्यांनी केला असून आता छोटे-मोठे हेलिकॉप्टर्स, अनेक सैनिकी साहित्य आता स्वदेशात बनवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!