Share

आता ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नवीन जुमला: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचा मोदींच्या भाषणावर निशाणा

Published On: 

मुंबई : आज देशभरात कोरोनाचे सावट असताना देखील राष्ट्रीय सण असलेला स्वतंत्रता दिवस सोशल डिस्टनसिंगचे भान राखत देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना स्मरण करून करून साजरा केला जात आहे. तर, या ७४ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर सबंध देशाला संबोधित केले.

आज, नरेंद्र मोदी यांनी देशातील अनेक योजनांसह कुरापती करणाऱ्या चीन-पाकबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावेळी दिसून आले. दरम्यान, भारताच्या महासत्ता होण्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा मंत्र हा या कोरोना काळात १३० कोटी भारतीयांसाठी महत्वाचा बनला असून हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच देशातील तरुण वर्ग,महिला शक्ती यांच्यावर पूर्ण विश्वास असून समृद्ध भारत बनवण्यासाठी मोठा वाटा तरुणांचा व महिलांचा असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.

पवार कुटुंबीय आज एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच बारामतीतून आली ‘ही’ मोठी बातमी

आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल कधी पर्यंत देत राहणार आणि त्यांच्याकडून तयार वस्तू घेत राहणार असा सवाल उपस्थित करून आता आत्मनिर्भर व्हावंच लागेल असे त्यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान मोदींनी आता ‘मेक इन इंडिया’ या अभियानाला विस्तृत करण्याची गरज असून आपण आपल्या देशाच्या गरजा भागवण्यासोबतच ‘वसुधैव कुटुंबकम’ या आपल्या संस्कृतीप्रमाणे भारतात नवनवीन उत्पादन बनवून जगातील असलेल्या गरजादेखील आपण पूर्ण करू शकतो शकतो यासाठीच आता ‘मेक फॉर वर्ल्ड’ ची देखील घोषणा केली.

पानपट्टीचा व्यवसाय सुरु करा अन्यथा…व्यवसायीकांची उपविभागीय अधिका-यांकडे धक्कादायक मागणी

या मेक फॉर वर्ल्डची आता काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी खिल्ली उडवल्याचे दिसते. त्यांनी एक ट्विट केले आहे. ‘ मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टँड अपच्या एकूणच अपयशानंतर आता “मेक फॉर वर्ल्ड”च्या नव्या जुमल्याच्या सगळ्यांना शुभेच्छा’, अशा प्रकारे त्यांनी ट्विटमध्ये टीका केली आहे.

ब्राह्मण समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता राज्य सरकारने परशुराम महामंडळा अंतर्गत मदत करावी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!