मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला डावलण्यात येतंय का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. महाजॉब्स पोर्टलवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करुन थेट महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले आहेत.
“महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे” अस ट्विट करत सत्यजीत तांबे यांनी आपली खदखद व्यक्त केली.
#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. pic.twitter.com/k8CMmOsmJv— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 16, 2020
त्यानंतर आता राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू कॉंग्रेस नेते राजीव सातव यांनी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावलं आहे. ‘योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत’. अस ट्विट करत सातव यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे.
राजस्थानच्या राजकारणाचा राज्यात परिणाम, कॉंग्रेसच्या ‘या’ झुंझार नेत्याची होणार हकालपट्टी ?
योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत. pic.twitter.com/kQYnyhlMO1
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) July 16, 2020
महाविकास आघाडी सरकार असताना, महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फोटो आहेत. यामध्ये काँग्रेस नेत्याचा फोटो नाही. या जाहिरातीवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत. हे सर्व त्या विभागांशी संबंधित मंत्री आहेत.
काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे भाच्चे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना जाहिररित्या महाविकास आघाडी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

