Share

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण

Published On: 

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवारी दुपारी अधिकृतपणे सांगण्यात आले. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफ वगळता कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. दरम्यान त्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

वय, मधुमेह लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात आहे. यासंदर्भात त्यांचे नातू माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, प्रकृती स्थिर आहे. १४ जुलैला ताप आला होता, त्यानंतर निलंगा येथून त्यांना लातूरला आणले. तिथे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. मला खात्री आहे ते कोरोनावर मात करून आपल्याशी संवाद साधतील, असेही ते म्हणाले. पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्याचा विचार सुरू आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे कुणाच्याही संपर्कात आलेले नसतांना त्यांना कोरोनाची लागण कशी झाली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांचे वय अधिक असल्यामुळे कुटुंबाकडून यापूर्वीच काळजी घेण्यात आली होती. त्यांना कोणत्याही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जाऊ दिले जात नव्हते.

सदाभाऊ खोत शनिवारी दौऱ्यावर;उगवण न झालेल्या सोयाबीन पिकांची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद

शिवाय ग्रामीण भागातील व शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत घरूनच कार्यरत होते. परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लातूर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. निलंगेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

निंलगेकरांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यासह संपर्कातील अशा १३ जणांची देखील तपासणी केली जाणार असल्याचे समजते. सोशल मिडियावर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पसरताच, या आजारातून ते लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा देणारे संदशे चाहत्यांकडून पाठवले जात आहेत.

राजस्थानच्या राजकारणाचा राज्यात परिणाम, कॉंग्रेसच्या ‘या’ झुंझार नेत्याची होणार हकालपट्टी ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!