🕒 1 min read
गोवा : देशातील अनेक राज्यांना तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसला आहे. तसेच केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. तर हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असून त्याने सध्या रौद्ररूप धारण केलंय. अभिनेता राजीव खंडेलवालने गोव्यामधील काही फोटो शेअर केले आहेत.
राजीव खंडेलवालने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात मेणबत्ती पेटलेली दिसतेय. त्याच्या शेजारी चेस ठेवलेला आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला आहे,” लक्षात आहे जेव्हा लाईट नसायची तेव्हा मेणबत्ती असायची. तौक्ते चक्रीवादळानंतरचे परिणाम .” तर राजीवने त्याच्या दुसर्या ट्विटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यात चक्रीवादळामुळे झाडांची पडझड झाल्याचं स्पष्ट दिसतंय. यात तो म्हणाला की, “मला खात्री आहे की ते पुन्हा उभे राहतील. गोव्याहून” असं तो पोस्टमध्ये म्हणाला आहे.
https://twitter.com/RK1610IsMe/status/1393824944283283457?s=20
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून १६० किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे. बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ बार्जवर २७३ जण अडकले आहेत, तर आणखी एका बार्जवर १३७ जण अडकले आहेत. अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यानं भीती व्यक्त करण्यात येतेय.अडकलेल्यांच्या सुटकेसाठी नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. तसंच, INS तलवार सुद्धा बचावासाठी रवाना झाली असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पनवतीयों का बाप है ये बॉस’, नितेश राणेंचे मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान
- दिलासा! आ.श्वेता महालेंनी सुरू केले आधार कोविड सेंटर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
- लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने भाजपचे तीन आमदार ताब्यात
- सकारात्मक! २५ दिवसांनंतर कोरोनाचे नवे रुग्ण तीन लाखांपेक्षाही कम

