Share

राजेश टोपेंचे पत्राद्वारे जनतेला कळकळीचे आवाहन; म्हणाले…

Published On: 

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधला. ‘सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली, तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला पत्राद्वारे कळकळीचे आवाहन केले आहे.

राजेश टोपे पत्राद्वारे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आपण करोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोनायोद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करु शकलो.

मात्र अद्यापही कारोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुध्द लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु करोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुध्दच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे.

समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉंकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.

शेवटी स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी आणि प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला, ‘एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असे आवाहन राजेश टोपे जनतेला केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!