Share

राज्यात २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू, तरी महाराष्ट्र बिनधास्त!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, असे असले तरी राज्यातील नागरिक कोरोनाबाबत अद्याप सावध झालेले दिसत नाही.

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधत कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर, नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची तयारी असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. मात्र, असे असतानाही राज्यात अनेक राजकीय आणि सांस्कृतीक कार्यक्रम सुरूच असल्याचं दिसून येतय. रस्त्यावरही लोक मास्क न लावताना फिरतांना दिसत आहे.

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ६ हजार ९७१ कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २ हजार ४१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, या सर्वात २४ तासातील मृत्यूचा आकडा ३५ रुग्णांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ५१ हजार ७८८ वर पोहोचली आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येतही वाढ झाली असून सध्या ५२ हजार ९५६ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!