मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गर्दी होणारी सर्वच ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. मात्र, विविध राजकीय नेत्यांकडून धार्मिक स्थळं उघडण्याबाबत मागणी होताना दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. अद्यापही मंदिरे सुरु करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले होते. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील मंदिर खुले करण्याची मागणी केली होती. मात्र आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारतर्फे धार्मिक स्थळं उघडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
ही तर तात्पुरती मलमपट्टी, खड्डे पडलेल्या रस्त्यावर तात्पुरते पॅच मारायचे काम सुरु
धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही. जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळाने सोमवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यातील मंदिरे सुरु करावीत अशी मागणी पुजाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली. यावेळी राज ठाकरेंनी कशाप्रकारे तुम्ही मंदिरे सुरु करणार, याची नियमावली आखा. मंदिरात झुंबड झाली तर काय करणार? याची नियमावली तयार करा, ही नियमावली राज्य सरकारकडे सुपूर्द करु अशी सूचना राज यांनी पुजाऱ्यांना दिली. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मीयांचे काय? ते सर्व नियम पाळतील का? अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली.
राज्यावरील कोरोनाचे… निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

