टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांची ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्यासाठीची असल्याचे बोलले जात आहे. परंतु दोघांच्या भेटी मागचे कारण अद्यापाशी स्पष्ट झाले नाही.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता मात्र तरीही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात संपूर्ण राज्यात सभा घेतल्या. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपची पोल खोल केली. राज यांच्या सभांचा कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र राज यांच्या सभांचा आघाडीला झिरो फायदा झाला. राज्यात महायुतीला ४१ जागा तर कॉंग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या.
विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत घेतले जाणार असल्याचे बोलले जात होते. तर शरद पवार आणि अजित पवार यांनी कॉंग्रेस समोर प्रस्तावही मांडला होता. त्यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मनसेला आघाडीत घ्यायचे का नाही हे ठरेल. असे म्हंटले होते.
इतकेच नव्हे तर, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या आघाडीच्या बैठकीत राज ठाकरे यांना आघाद्दीत घेण्याबाबत चर्चा झाली परंतु सर्व नेतांचे एकमत झाले नसल्याने आजून त्यावर निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
याचदरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मात्र या भेटी मागचे कारण अद्यापही समोर आले नाही. परंतु दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.


