मुंबई : राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न झाल्याचं वृत्त आहे . महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर हा साखरपडा संपन्न झाला आहे.फॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. हा सोहळा मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला आहे.
अमित हा राज ठाकरे यांचा मुलगा असून मिताली बोरुडे हि फॅशन डिझायनर आहे . विशेष म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस आणि याच दिवशी अमितचा साखरपुडा झाला. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात झालं .एकूणच राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल जनतेला नेहमीच उत्सुकता आहे. शिवाय अमित नुकताच मोठ्या आजारातून बरा झालाय, त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनाच आनंद झालाय.








बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

