मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही, राज्यभरात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या राज ठाकरेंनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 13 मे रोजी ठाण्यात मनसेचा पदाधिकारी कार्यशाळा होईल. यात स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत.राज ठाकरे पक्षाची नव्याने बांधणी सुरु केली असल्याची चर्चा आहे. ठाण्यात बोलावलेल्या या बैठकीत आघाडीसोबत जायचं कि नाही याची देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


