Share

राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण आमचं हिंदुत्व व्यापक- फडणवीस

Published On: 

मुंबई:- राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही. राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण आमचं हिंदुत्व व्यापक अशी भूमिका भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वाहिनीशी बोलताना मांडली आहे.

आम्ही व्यापक हिंदुत्ववादी आहोत. या देशाची संस्कृती जे आपली मानतात अशा सर्व लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्यात घेतलं आहे. कुणाची व्याख्या आमच्या व्याख्याशी जुळली तर त्यांना सोबत घ्यायला आम्हाला हरकत नाही. “वाद आम्हाला मान्य नाही. मराठी माणसाच्या हक्काकरता आम्ही देखील शेवटपर्यंत लढू. पण त्यासोबत अमराठी माणसावर अन्याय करणं म्हणजे मराठी माणसाकरता लढणं असं आमचं मत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसे आणि भाजप एकत्र येईल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, आमच्यासोबत काही छोटे मित्र आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!