Share

मुंबईत राज ठाकरेंच्या सभांवर ब्रेक ; निवडणूक आयोगानं नाकारली परवानगी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबई मधल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. २४ एप्रिलला ही सभा घेण्यात येणार होती परंतु मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई सभेची परवानगी नाकारली आहे.

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची ‘लाव रे तो व्हिडीओ ‘ स्टाईल सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढच्या सभांमध्ये राज ठाकरे कोणता नवीन व्हिडीओ घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु राज ठाकरेंच्या मुंबईमधल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे.

यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!