Share

राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना पत्र !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ‘ईव्हीएम’ला विरोध करण्याचं आवाहन केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर भाजपची सत्ता येणं शक्य नाही, असं सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. राज यांनी शरद पवार यांची भेट घेवून ईव्हीएमला विरोध करण्याचं आवाहन केलंय.

तसेच रविवारी होणाऱ्या ईव्हीएम विरोधातील रॅलीला पाठींबा देण्याची विनंती केली. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात याविषयी बराचवेळ चर्चा झाली. बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी आपण निवडणूक आयोगाकडे दाद मागू, असं आश्वासन शरद पवार यांनी राज यांना दिल्याचं समजतंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमला उघडपणे विरोध करणारे राज ठाकरे हे पहिले नेते आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!