टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी कॉंग्रेस अनुकूल झाल्याचे पहायला मिळत असताना मनसेने मात्र आता सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष जरी मनसेला सोबत घ्यायला इच्छुक असले तरीही राज ठाकरे हे आंध्र प्रदेशमधील वायएसआर रेड्डी यांचे अनुकरण करतील, असे सांगितले जात आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५० जागा जिंकून जगनमोहन रेड्डी यांनी इतिहास रचला आहे. यंदाच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांनी निवडणुकीपूर्वी कोणत्याही पक्षासोबत युती करणे टाळले. त्यांनी राज्यभरात पक्षाचा प्रचार केला आणि निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. लोकसत्ता आणि ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवतील, अशी शक्यता आहे. राज ठाकरे हे आंध्र प्रदेशमधील वायएसआर रेड्डी यांचे अनुकरण करतील, असे सांगितले जात आहे.
राज्यात राज ठाकरेही अशीच कामगिरी करतील, असा दावा मनसेमधील नेत्याने केला आहे. राज्यात सरकारविरोधात लाट असली तरी विरोधी पक्ष म्हणून एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे राज ठाकरेच करु शकतात, असा दावा मनसेमधील सूत्रांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

