Share

राज ठाकरेंनी ‘हा’ प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच की काय राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा ध्वज बदलत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून साकारलेल्या राजमुद्रेचा वापर करीत आहेत. त्यांनी हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल, असा इशारा आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला आहे.

आपल्या राजकीय वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पक्षाचा ध्वज बदलत असताना त्यात राजमुद्रेचा वापर असल्याचे ऐकून दु:ख झाले. राजमुद्रेला एक अधिकृततेची झालर असते. ती त्या ठराविक राज्याची ओळख असते. त्यामुळे तिचा वापर करणे गैरकृत्य आहे. राजमुद्रा ही तमाम शिवप्रेमींचा आदर्श, प्रेरणादायी आहे. तिचा वापर कुठल्याही पक्षासाठी करणे म्हणजे स्वराज्याचा विचार मर्यादित करण्यासारखे होईल. अस विनोद पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे.

तर, राजमुद्रा ही एक विचार आहे, तिचे एक पावित्र्य असून तिचा कुठल्याही पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापर करणे म्हणजे दुर्दैवीच होईल. त्यामुळे हा प्रकार टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!