पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर हार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. निधनाचं वृत्त कळताच ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते. बाबासाहेबांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांनी पुण्यात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला होता.
दरम्यान, ठाकरे कुटुंब आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे असणारे ऋणानुबंध सर्वज्ञात आहेत. या नातेसंबंधांमधला एक तारा बाळासाहेबांच्या निधनानंतर निखळला होता. ज्यानंतर आता बाबासाहेबांच्या निधनानं आणखी एक तारा निखळला. हे दु:ख राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला’
- शिवसेनेचा बुलंद आवाज, महविकास आघाडीची धडाडती तोफ; आव्हाडांच्या राऊतांना शुभेच्छा
- ‘या’ अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे- मुख्यमंत्री ठाकरे
- शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे जीवनातली मोठी उपलब्धी- राज्यपाल कोश्यारी
- पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

