🕒 1 min read
पुणे : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गट दावा करत आहे. एकीकडे आमच्याकडे दोनतृतीयांश आमदारांचे बहुमत आहे, असे शिंदे गट म्हणतो. आमचे सरकार कायदेशीररित्या स्थापन झाले आहे. एवढेच नाही तर शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आमचा समान अधिकार आहे. त्याचवेळी आम्हाला न्यायालयातून नक्कीच न्याय मिळेल, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. आज शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांचा असल्याचे म्हटले आहे. या लढाईत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करत शिंदे गटाला सवाल केला आहे.
भाजपचे नेते असली शिवसेना आमच्यासोबत असल्याचा दावा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील तेव्हा शिवसेनेने आमच्या पाठीच खंजीर खुपसला होता. त्यामुळे खरी शिवसेना (शिंदे गट) आमच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.
बंडखोर शिंदे गटाचा संबंध कुठे येतो-
रुपाली पाटील म्हणाल्या, “शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसेनेवर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी सुद्धा अधिकार दाखवला नाही. मग बंडखोर शिंदे गटाचा संबंध कुठे येतो. भाजपने लोकांच्या घरात डोकावून बाप कोण सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.”
शिवसेना ही मा.बाळासाहेब ठाकरे,मा.उद्धव साहेब ठाकरे यांचीच
शिवसेनेवर अधिकार खुद्द मा.बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे मा.राज साहेब ठाकरे यांनी सुद्धा नाही दाखवली.
मग बंडखोर शिंदे गटाचा संबंध येतो कुठे,
भाजपने लोकांच्या घरात डोकावून बाप कोण सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.— Rupali patil thombare (@Rupalispeak) August 10, 2022
शरद पवार काय म्हणाले –
शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत.”
महत्वाच्या बातम्या :
- Nitish Kumar । “अटलजींच्या काळात जास्त प्रेम होते, पण पंतप्रधान मोदी…”; नितीश कुमार यांची खोचक टीका
- Kishori Pednekar । शपथ घेतल्यानंतर एकही मंत्री बाळासाहेबांच्या स्मृति स्थळावर गेला नाही – किशोरी पेडणेकर
- Kadar Dighe | केदार दिघे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावर मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, म्हणाले…
- Bacchu Kadu | शिंदे गट सोडण्यावर बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, “थोडी नाराजी आहे, पण…”
- Devendra Fadnavis | शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे… – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

