टीम महाराष्ट्र देशा : राज्यातल्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. राज्यातल्या तरूणांची राज्य सरकारने फसवणूक केली असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवलं आहे. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.


