Share

पावसाचे पुनरागमन: मुंबईसह उपनगरात हजेरी, तर राज्यभरात देखील सक्रिय होण्याचा अंदाज

Published On: 

मुंबई: गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत बरा पाऊस झाला आहे. अजून पावसाचा बराच हंगाम बाकी असला तरी मधल्या काळात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गेले काही दिवस पावसाने पुन्हा दडी मारल्याचे चित्र निर्माण झाले होते. एकीकडे आसाम सारख्या राज्यात पुराने हाहाकार माजवला आहे तर महाराष्ट्रात अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षाच होती.

दरम्यान, पुणे हवामान खात्याने या २ दिवसात पाऊस राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार,  मुंबई आणि उपनगरात आज (23 जुलै) सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीआहे. दादर, लालबाग, परळ भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. येथील सखल भागात पाणीही साचण्याची शक्यता वर्तवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर धरणक्षेत्रात देखील चांगला पाऊस अपेक्षित असून त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. कोकणासह दिदर्भात देखील आता पर्यंत पाऊस समाधानकारक झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रात अजून दमदार पावसाची गरज आहे.

आता खऱ्या शिवसैनिक शोभता, कॉंग्रेस नेत्याकडून मराठीत शपथ घेणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींचं कौतुक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!