Share

राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय; मतदानाच्या दिवशीही मुसळधार पावसाचा अंदाज

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई येथे सोमवारी विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा अंदाज आहे.

पुणे, मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी शनिवारी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये रिमझिम तर पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस आहे. पश्चिम हाराष्ट्रात 23 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पवसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात वरुणराजाने काल सकाळपासूनच हजेरी लावली आहे. पुण्यात शनिवारी दिवसभर पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली, तो रात्री उशिरापर्यंत पडत होता.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1185848010560794624?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185845060325085184?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!