🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – गुजरातच्या दिशेनं येत असलेल्या माहा नावाच्या चक्रीवादळामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशासाठी आज पावसाचा दिवस आहे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज काही ठिकणी जोरदार वृष्टी होऊ शकते. मराठवाड्यातही काही ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस हजेरी लावेल.
विदर्भात मात्र हवामान कोरडं राहील. हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत कधीही गुजरातच्या किनाऱ्यावर धडकू शकतं. त्यामुळे ठाणे आणि पालघरचा समुद्रही खवळलेला राहणार असल्यानं या जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या हे चक्रीवादळ महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश सीमेलगतच्या भागातून पुढे वाटचाल करताना पुन्हा कमीदाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होणार आहे. त्याच्या प्रभावामुळे खान्देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाऊसमान वादळ पुढे गेल्यानं उद्या थोडं कमी होईल. मराठवाड्यात ते आजच्यासारखंच असेल. आज कोरडं हवामान असलेल्या विदर्भात उद्या काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान माहा चक्रीवादळ शमण्यापुर्वी आजच अंदमान निकोबार बेटांजवळ बुलबुल नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे. या वादळाची तीव्रता वाढत जावून त्याची वाटचाल ओडिशाच्या दिशेनं अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191978772330881024?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191983257274830848?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
