Share

Rain Update: मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाची दमदार हजेरी

Published On: 

मुंबई: हवामान विभागाने या आठवड्यात संपूर्ण राज्यासह मुंबई, पुण्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरत असून मुंबईत गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर, यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.

तसेच, लोकल वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई महापालिकेने काल खाजगी व सरकारी कार्यालये बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यांनतर, आज देखील पावसाचा जोर कायम असून मुंबईमध्ये मुसळधार, पुण्यात अतिवृष्टी, कोकणात जोरदार, पश्चिम महाराष्ट्रात देखील संततधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

“सावरकरांनी सांगितलं होतं, एक दिवस येईल जेव्हा मतांसाठी काँग्रेस नेते कोटावर जानवं घालतील” : चित्रा वाघ

दरम्यान, जून, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने पुण्यातील धरणसाठ्यात देखील घट होत होती. तर, गेल्या २ दिवसात पावसाने जोर धरल्याने या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. काल, महाडमध्ये सावित्री नदी देखील धोक्याच्या पातळीने वाहत असल्याने बाजारात पाणी शिरले होते. तर, कोल्हापुरातील ५ बंधारे पाण्याखाली गेले असून काल रात्रीपर्यंत पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये ४ फुटांची वाढ झाली होती.

थेट कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन तुकाराम मुंढे यांनी साधला रुग्ण आणि नागरिकांशी संवाद

तसेच, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काल रात्री सुरु झालेला पाऊस अजून देखील जोरदार वाऱ्यासह कोसळत असताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार तर अरबी समुद्रात  चक्रीय  परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा जोर  वाढवण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात सात ऑगस्टपर्यंत तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सहा ऑगस्टपर्यंत तर विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!