🕒 1 min read
मुंबई : बंगालच्या उपसागरात उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशाच्या तट वरती क्षेत्रात कमी दाबाचा निर्माण झाल्याने , संपूर्ण राज्यात जोरदार पाउस पडत आहे . या पार्श्वभूमीवर आगामी २४ तासात तटवरती दोन जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा तसच पूर स्थिती निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ओडिशातील ८ जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातला पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे वाढला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हा जोर आणखी 5 दिवस कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे नवी मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. सकाळपासूनच पावसाने संततधार लावून धरल्याने रहिवाशांना बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
ठाण्यातही काल मध्यरात्रीपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कल्याण नजीक असलेल्या अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हा जोर आणखी 5 दिवस कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात काल सकाळपर्यंतच्या 24 तासात माथेरान, पालघर, ठाणे, सातारा, महाबळेश्वर, नाशिक, पुणे, आणि चंद्रपूर इथं 70 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
राज्यात सर्वाधिक 140 मिलिमीटर पावसाची नोंद माथेरानमध्ये झाली आहे. मराठवाड्यातला पावसाचा जोरही आज वाढेल. इतर भागात कालच्या सारखाच दमदार पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- सोमय्या मुश्रीफांविरोधात उद्या ईडीकडे तक्रार नोंदवणार तर परवा केंद्रात तीन ठिकाणी पुरावे देणार
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार; मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- सोमय्यांना चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली मग त्यांनी माझ्यावर आरोप केले-हसन मुश्रीफ
- स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
